Email Marketing In Marathi

  


ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय?

मार्केटिंग म्हणजे काय? ई-मेल म्हणजे काय? हे तर आपल्या सर्वाना माहीतच आहे. आपले सर्वांचे Email ID पण असतील. म्हणून जर सोप्या भाषेत सांगायचं झालं एखादी कंपनी आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल चे मेल पाठवते. या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात.
जी मार्केटिंग ई-मेल द्वारे केली जाते, त्या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात. एक commercial message ई-मेल द्वारे पूर्ण ग्रुप मध्ये पाठवणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय.


ई-मेल मार्केटिंग चे प्रकार

 जेव्हा आपण कोणत्यापण ब्लॉग वेबसाईट, बिजनेस वेबसाईट, ईकॉमर्स वेबसाईट वर visit करतो, तेव्हा आपण आपला मेल त्यांच्या subscribe mail च्या button वर क्लिक करून त्यांना देतो. याचे कंपनी चे मुख्यतः दोन च कारण असतात.

एक म्हणजे कंपनी च promotion करणे, branding create करणे, कंपनी च्या नवीन update किंवा offer update असतील त्या ई-मेल द्वारे आपल्यापर्यंत पोहचवणे.

दुसरं कारण म्हणजे त्या वेबसाईट वर ट्रॅफिक generate करणे, lead generate करणे, कंपनी च्या update आपल्यापर्यंत पोहचवणे. या दोन कारणासाठी च कंपनी आपले ई-मेल घेते.

1) Transactional Email:

जेव्हा आपण ब्लॉग वेबसाईट किंवा एखाद्या कोणत्यापण वेबसाईट वर आपला ई-मेल id देतो. तेव्हा त्यांच्या नवीन पोस्ट किंवा नवीन ऑफर्स आपल्याला दिसतात. म्हणजेच आपण स्वतःहून ते मेल id देतो,कारण आपल्याला पण त्या वेबसाईट च्या पोस्ट किंवा ऑफर पाहिजे असतात.

म्हणजेच कस्टमर जेव्हा कंपनी ला मेल id देतो आणि मग ती कॉमपणी किंवा ब्लॉग वेबसाईट कस्टमर ला त्यांचे मेल पाठवते त्याला transactional email म्हणतात.

2) Direct Email:

जेव्हा आपण ईकॉमर्स वेबसाईट वर किंवा एखाद्या कंपनी च्या सर्व्हिस वेबसाईट वर जातो. त्या वेबसाईट वर वरून जर आपल्याला त्यांचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करायची असेल तर आपल्याला त्या वेबसाईट वर आपलं अकाउंट create करा लागते.

त्यामध्ये कंपनी आपलं नाव, contact नंबर, ई-मेल Id घेते. तेव्हा आपलं अकाउंट create होते मग आणि त्यांची सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट खरेदी करू शकतो. यामध्ये आपण आपल्या मर्जी नुसार मेल दिलेला नसतो. कंपनी डायरेक्ट आपला मेल घेते. 

आपला मेल त्यांच्याकडे घेतल्यावर मग ते आपल्याला ई-मेल मधून त्यांचे नवीन प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल promotional मेल करतात. यालाच direct email असे म्हणतात.

 

ई-मेल मार्केटिंग कशी करायची? 

1) Add Email Subscribe Button:

जर तुम्ही एखाद्या ब्लॉग वेबसाईट चे owner असाल किंवा एखाद्या ईकॉमर्स वेबसाईट चे owner असाल तर तुम्ही तुमच्या वेबसाईट वर email subscription चे बटण लावून तुमच्या वेबसाईट वर येणाऱ्या users किंवा customers च ई-मेल घेऊ शकता.

प्रत्येक users चे मेल id collect करून तुम्ही त्याची एक लिस्ट बनवू शकता.

2) Buy Email List:

मार्केट मध्ये अशा खूप कंपनी आहेत, ज्या ई-मेल लिस्ट provide करतात. तुम्ही त्यांच्याकडून ई-मेल लिस्ट खरेदी करू शकता.

3) Select Service Provider:

जेव्हा तुमच्याकडे मेल लिस्ट आली. त्यानंतर ई-मेल मार्केटिंग ला खरी सुरवात होते. ई-मेल लिस्ट तयार झाल्या नंतर तुम्हाला एक ई-मेल सर्विस provider choose करा लागेल. म्हणजेच अशा काही कंपनी आहेत ज्या ई-मेल मार्केटिंग सर्व्हिस provide करतात. 

4) Account Create:

 वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट create करा. यावर तुम्ही फ्री मध्ये ई-मेल मार्केटिंग करू शकता. आणि तुम्हाला ई-मेल मार्केटिंग मधून जर चांगला रिस्पॉन्स आला आणि तुमची ई-मेल लिस्ट पण वाढली तर तुम्ही यांचा upgrade प्लॅन घेऊन ई-मेल मार्केटिंग करू शकता.

4) Select Template & Message:

यावर अकाउंट ओपन करणे खूप easy आहे. त्यानंतर तुम्ही एक template सिलेक्ट करा. खूप टेम्प्लेट अगोदर च दिलेले असतात. तुम्ही तुमच्या मतानुसार टेम्प्लेट निवडू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुमचा message type करा जो तुम्हाला तुमच्या कस्टमर ला पाठवायचा आहे.

5) Run Campaign:

message लिहिल्यानंतर तुम्हाला तुमची ई-मेल लिस्ट तिथे सबमिट करा लागते. आणि ई-मेल मार्केटिंग campaign रन करा लागेल. यामुळे तुमच्या लिस्ट मध्ये जेवढे काही ई-मेल आहेत त्या सर्वाना mail-chimp मधून at a time ई-मेल पाठवले जातात.

ई-मेल मार्केटिंग चा वापर काय?

1) Get Customer Relationship:

ई-मेल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही एक चांगलं नातं निर्माण करू शकता. त्यांना festival च्या दिवशी ई-मेल पाठवून relation build करू शकता. त्यामुळे कस्टमर पण तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमचं एक नातं तयार होते.

2) Send Company Updates & Blog Updates:

ई-मेल मर्केटिंग मुळे तुम्ही तुमच्या कस्टमर ला कंपनी बद्दल च्या रेगुलर update देऊ शकता. जर तुम्ही ब्लॉगिंग करत असणार तर तुमच्या नवीन ब्लॉग ची उपडेट त्यांना ई-मेल मधून देऊ शकता.

3) Understand Customer Behaviour:

जेव्हा तुम्ही ई-मेल मार्केटिंग करता म्हणजेच तुमच्या कस्टमर ला message पटवता त्यांमधून त्यांचा response कसा येतो, त्यांना कोणत्या type चे प्रॉडक्ट किंवा सर्विस आवडतात हे ट्रॅक करू शकता. यामुळे तुम्ही त्या कस्टमर ला आवडणारे प्रॉडक्ट विकू शकता.

4) Professional Targeting:

ई-मेल मार्केटिंग ने कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये प्रोफेशनल targeting करू शकता.

5) Website Traffic:

ब्लॉगिंग वेबसाईट साठी तसेच सर्व बिजनेस वेबसाईट साठी ट्रॅफिक खूप महत्वाचे असते. त्यामुळे तुम्ही ई-मेलमार्केटिंग करून तुमच्या वेबसाईट वर ट्राफिक generate करू शकता.

बिजनेस साठी ई-मेल मार्केटिंग चे फायदे कोणते?

  • ई-मेल मार्केटिंग एक असं मार्केटिंग आहे कि ज्यामुळे तुम्ही खूप लोकांपर्यंत at a time पोहचु शकता. ज्या लोंकाना तुम्ही ओळखत पण नाही फक्त त्यांचे ई-मेल तुमच्याकडे असल्यावर त्यांना पण तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस विकू शकता.
  • ई-मेल मार्केटिंग कमी वेळेत आणि कमी खर्चात करता येते.
  • ई-मेल मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या बिजनेस साठी lead generate करू शकता.
  • ई-मेल मार्केटिंग द्वारे तुम्ही तुमच्या कंपनी च प्रमोशन करू शकता.
  • ई-मेल मार्केटिंग करू तुम्ही तुमचा sale increase करू शकता.
  • ई-मेल मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या real customer पर्यंत पोहचु शकता,
  • वेबसाईट वर ट्रॅफिक आणून वेबसाईट बूस्ट करू शकता.
  • ई-मेल मार्केटिंग ने तुम्ही retargeting करू शकता. एखाद्या कस्टमर ने तुमचा मेल ओपन केला पण प्रॉडक्ट घेतलं नाही तर त्या कस्टमर ला ट्रॅक करून परत त्याला मेल पाठवू शकता.

ई-मेल मार्केटिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

  • ई-मेल मार्केटिंग करताना तुमचे ई-मेल प्रोफेशनल असायला पाहिजे.
  • कोणतेही scam असणारे ई-मेल करू नये ज्यामुळे कस्टमर तुम्हाला unsubscribe करेल.
  • आठवड्यातून 2 किंवा 3 मेल च कस्टमर ला पाठवले पाहिजे. Continue ई-मेल पाठवल्याने कस्टमर irritate होऊ शकतो.
  • ई-मेल लिहताना त्यामध्ये 75% प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल माहिती असावी आणि 25% प्रोमोशनल माहिती असावी. ज्याने कस्टमर ला लवकर समजण्यास मदत होईल.
  • ई-मेल पाठवायचा time फिक्स असावा. जास्तकरून working hour मधेच मेल पाठवावा.

Comments

Popular posts from this blog

Why Digital Marketing is Need for Small Business in Covid19 Situation?

आम्ही काय करतो?